Ladki Bahin Yojana:: मित्रांनो आजकाल लाडकी बहीण योजना चे पैसे सगळ्या महिलांना येत आहेत पण अश्या काही महिला आहेत ज्यांना अजून पण या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि त्यांच्या account ला पैसे आले नाहीत तर आता त्यांनी काय करावे हे आपण जाणून घेऊया. तर या साठी आम्ही आपल्याला खाली काही स्टेप्स दिल्या आहेत त्या फोलो करा.
सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे ॲप्लिकेशन अप्रोवेड झाले असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. परंतु खुप काही महिलांचे ॲप्लिकेशन अप्रूवेड झाले आणि त्यांना पैसे अकाउंट मध्ये आले असा मेसेज नाही आले. तर त्यांना सांगू इच्छितो की तुमचे आधार कार्ड ज्या बँक ल लिंक आहे त्याच बँक मध्ये पैसे येणार आहे.
बहुतांश महिलांना मेसेज नही आला आहे त्यामुळे त्या चिंतेत आहे, पण त्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या सगळ्या बँक अकाउंट मध्ये चेक करून पहावे आपले पैसे नक्की आले असणार. आता ज्यांना पैसे आले नाही त्यांनी काय करावे ते जाणून घेऊ.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही हे करा
आताच आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड कोणत्या बँक ल लिंक आहे हे चेक करा. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर लिंक करून द्या, बँक ल लिंक झाले तर लगेच तुमचे पैसे तुमच्या बँकेत येणार आहेत. आता हे पैसे आले की नाही हे तुम्हाला बँक मध्ये जाऊनच कळणार कारण बहुतांश महिलांना या योजनेचे पैसे क्रेडिट झाले याचा मेसेज येत नाही.
काही वेळेस तुमच्या आधार कार्ड वर काही चुका असेल तर त्या दुरुस्त करून घ्या तर लगेच तुम्हाला तुमचे पैसे मिळेल. माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिलांना जरूर शेअर करा.